Manasvi Choudhary
नाश्त्याला मिक्स डाळींचे थालीपीठ तुम्ही घरीच बनवू शकता. थालीपीठ बनवण्याची रेसिपी सोपी आहे. मिक्स डाळींचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मिक्स डाळींचे थालीपीठ बनवण्यासाठी उडीद डाळ, मूग डाळ,चना डाळ, ज्वारी, बाजरी, लसूण, तीळ, मीठ, तूप हे साहित्य एकत्र करा.
थालीपीठ बनण्यासाठी सर्वात आधी उडीद डाळ, मूग डाळ, चना डाळ, ज्वारी बाजरी एकत्र करून पीठ तयार करून घ्या.
या मिश्रणात आलं- लसूण पेस्ट, जिरे, तीळ, मीठ घाला नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठाचा मऊ गोळा बनवावा.
मध्यम आकाराचे गोळे बनवून चपातीसारखे लाटून घ्या.
गॅसवर गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी थालीपीठ खरपूस भाजून घ्या.
अशाप्रकारे नाश्त्यासाठी गरमा गरम थालीपीठ तयार होतील .