Saam Tv
बाजारात मिळणाऱ्या मिरचीच्या लोणच्यापेक्षा घरी केलेल्या लोणच्याची चवच वेगळी असते. फक्त काही मसाले आणि थोड्याश्या तेलामुळे मिरचीचे लोणचे चविष्ट होईल.
सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या स्वच्छ धूवून घ्या. त्यांना कोमट उन्हात व्यवस्थित सुकू द्या.
सुकलेल्या मिरच्यांना मध्येच हलकं कापून घ्या. खूप कापले जाणार नाही याची काळजी घ्या . नाहीतर मसाला मिरचीत नीट मुरणार नाही.
त्यानंतर एका भांड्यात राई, बडिशेप आणि मेथी बारीक वाटून घ्या. त्यात जराशी हळद, मीठ आणि आमचूर पावडर मिक्स करा.
हा झाला मिरचीचा मसाला तयार. हाच मसाला आता मिरचीत नीट भरायचा. या मसाल्यामुळेच मिरचीच्या लोणच्याला खरी चव येते.
तव्यात तुम्ही वापरत असलेले तेल गरम करायला ठेवा. तर दुसरीकडे मिरचीमध्ये तयार मसाला भरण्यास सुरूवात करा.
व्यवस्थित गरम झालेले तेल थोडं थंड झाल्यावर मसाला भरलेल्या मिरच्यांवर ओता. तेल आणि मसाला आणि मिरची व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर लोणचे साठवण्यासाठी काचेची भरणी घ्या. काचेच्या भरणीत लोणचे छान राहते. काही दिवस लोणचे मुरू द्या.त्यामुळे खाताना लोणचे चवीष्ट लागेल.