ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलं लवकर काळे पडते आणि त्याची चव बदलते म्हणून आल्याची पेस्ट बनवल्यानंतर तीचे योग्य स्टोरेज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ताजे आले आणि पाणी घ्या. आल्याची साल काढून लहान तुकडे करा. यानंतर मिक्सरमध्ये टाकून गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या.
आल्याची पेस्ट बनवताना १ चमचा मीठ घालून वाटल्यास पेस्ट जास्त दिवस ताजी राहते.
पेस्ट बनवून झाल्यानंतर पेस्टच्या वर १ ते २ चमचे तेल टाकून लेयर बनवल्यास बॅक्टेरिया वाढत नाही आणि पेस्ट खराब होत नाही.
पेस्ट केल्यानंतर ती कधीच स्टीलच्या डब्यात ठेवू नका. पेस्ट ही नेहमी काचेच्या डब्यात किंवा एअरटाईट कंटेनर वापरा.
पेस्टमध्ये १ चमचा लिंबू रस घातल्याने पेस्टचा रंग बदलत नाही आणि पेस्ट जास्त काळ चांगली राहते.
पेस्टला छोट्या आईस क्यूब ट्रेमध्ये भरा आणि जास्त काळासाठी साठवून ठेवा.