Manasvi Choudhary
आलं आणि लिंबू पाण्यात मिक्स करून प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
आले आणि लिंबू दोन्ही पचनासाठी चांगले मानले जातात. आले पाचक रसांच्या निर्मितीस मदत करते, ज्यामुळे अन्न पचनास सोपे होते.
लिंबू व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
आले आणि लिंबू दोन्ही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होते आणि निरोगी राहते.
आले आणि लिंबू यांचे मिश्रण वजन कमी करण्यास देखील मदत करते. आल्यामुळे भूक कमी लागते आणि लिंबू शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते.
आले आणि लिंबू यांचे मिश्रण प्यायल्याने सर्दी, खोकला आणि घसादुखी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये किसलेले आलं आणि लिंबाचा रस मिक्स करा.