Manasvi Choudhary
वांगा बटाट्याची भाजी ही प्रसिद्ध आहे.
लग्नसंमारभ असो की कोणताही एखादा कार्यक्रम वांगा बटाटा भाजी बनवली जाते.
वांगा बटाटा भाजी बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.
वांगा बटाटा भाजी बनवण्यासाठी वांगी, बटाटा, टोमॅटो, कांदा, तेल, जीरे मोहरी, आले लसूण पेस्ट, हळद, तिखट,धणे पावडर, मसाला, मीठ आणि कोथिंबीर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम वांगे, बटाटे, टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर वांग्याच्या थोड्या मोठ्या फोडी करून पाण्यात बुडवून ठेवाव्यात. म्हणजे त्या काळ्या पडत नाही.
टोमॅटो बारीक चिरून बटाट्याच्या साली न काढता फोडी करून घ्या.
आता गॅसवर एका कढईत गरम तेलामध्ये जीरे मोहरी, कांदा आणि आले लसूण पेस्ट घाला. सर्व मिश्रण एकत्रित परतून घ्या.
नंतर यामध्ये बटाटे घाला आणि मिश्रण एकत्रित करा. संपूर्ण मिश्रण वाफेवर शिजवून घ्या.
मिश्रणात हळद, तिखट, धणे पूड, मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. नंतर टोमॅटो घालून मिश्रणावर झाकण घाला.
आता यामध्ये वांग्याच्या फोडी घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. मिश्रणात थोडे पाणी घालून योग्यरित्या शिजवून घ्या. नंतर यामध्ये कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे सर्व्हसाठी वांगा बटाटा भाजी तयार आहे.