Gavhachi Kheer Recipe: गोडाचा पदार्थ खायचाय? मग बनवा गव्हाची खीर, वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

गोडाचा पदार्थ

घरी काहीतरी गोड बनवायचं असेल आणि रोजचा शिरा खाऊन वैतागळा असाल तर ही रेसिपी खूप भन्नाट आहे.

Gavhachi Kheer Recipe

साहित्य

1 कप गहू, 1 लिटर दूध, 1 कप साखर किंवा गूळ, 2 चमचे तूप, 8 ते 10 बदाम, 8 ते 10 काजू, 5 ते 6 पिस्ते, 4 ते 5 वेलची, केशर थोडे मनुके आणि ओल्या खोबऱ्याचा कीस इ.

wheat kheer recipe

गहू भिजवण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम गहू स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे गहू मऊ होतो आणि खीर बनवताना सहज शिजतो.

gavhachi khir in marathi

गहू जाडसर वाटून घ्या

भिजवलेला गहू पाणी काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. पूर्ण बारीक पेस्ट करू नये.

homemade dessert

तुपात गहू भाजा

कढईमध्ये तूप गरम करून वाटलेले गहू हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. यामुळे खिरीला छान सुगंध येतो.

homemade dessert

दूध घालून मंद आचेवर शिजवा

भाजलेल्या गव्हामध्ये गरम दूध घाला आणि मंद आचेवर सतत हलवत शिजू द्या. गहू पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवणे आवश्यक आहे.

traditional Marathi recipe

साखर किंवा गूळ योग्य वेळी घाला

गहू व्यवस्थित शिजल्यानंतर साखर किंवा गूळ घालावा. गूळ वापरत असल्यास दूध फाटणार नाही याची काळजी घ्या.

traditional Marathi recipe

ड्रायफ्रूट्समुळे वाढते चव

काजू, बदाम, पिस्ते, खोबरं आणि मनुके तुपात हलके भाजून खिरीमध्ये घाला. यामुळे खिरीची चव वाढते.

homemade dessert

वेलची आणि केशरचा सुगंध

शेवटी वेलची पावडर आणि केशर घालून खीर 2 मिनिटं उकळा. यामुळे पारंपारिक स्वाद जास्त खुलतो. गव्हाची खीर गरम किंवा फ्रिजमध्ये थंड करून दोन्ही प्रकारे खाऊ शकता.

homemade dessert

NEXT: 7 दिवसांत चेहरा होईल चमकदार, हे स्किनकेअर लगेचच करा फॉलो

Viral Skincare Trend
येथे क्लिक करा