Surabhi Jayashree Jagdish
पित्ताचा त्रास असलेल्या लोकांना तिखट, तेलकट या पदार्थांमुळे अॅसिडिटी वाढते. फोडणीचा भात अनेकांना आवडतो, पण तो चुकीच्या पद्धतीने केला तर तो पित्त वाढवू शकतो.
साहित्य, हलकी फोडणी आणि संतुलित मसाले वापरले तर फोडणीचा भात पित्त न वाढवता पचायला हलका होऊ शकतो. घरच्या घरी सहज करता येईल असा पित्त होणार नाही असा फोडणीचा भात कसा बनवायचा, ते पाहूयात.
जुना तांदूळ वापरल्यास भात हलका राहतो. अतिशय चिकट किंवा नवीन तांदूळ टाळावेत. भात मोकळा शिजला पाहिजे.
अतिशय कमी प्रमाणात साजूक तूप घ्या. कारण जास्त तेल पित्त वाढवू शकतो. तूप पचनाला मदत करतं आणि चवही सौम्य ठेवतं.
हिरवी मिरची पित्तासाठी त्रासदायक ठरू शकते. हवी असल्यास अगदी अर्धी मिरची वापरा. मिरचीचा वापर पूर्णपणे टाळण्यासही फायदा होतो.
कढीपत्ता पचन सुधारतो आणि वास छान आणतो. य़ाशिवाय त्यात हिंग चिमूटभरच घालावं. दोन्ही गोष्टी गॅस आणि अॅसिडिटी कमी करतात.
हळद, लाल तिखट किंवा गरम मसाले घालू नका. यामुळे पित्ताचा त्रास वाढतो. साधी फोडणीच पित्तासाठी योग्य ठरते.
लिंबू पित्त वाढवू शकते. भातासोबत ताक घेतल्यास थंडावा मिळतो. यामुळे भात सहज पचतो आणि पोट हलकं राहतं.