Sakshi Sunil Jadhav
चपातीसाठी मध्यम मऊ आणि लवचीक पीठ असावं. फार घट्ट किंवा फार सैल पीठ केल्यास चपाती न फुगत नाही.
एकदम जास्त पाणी घातल्यास पीठ चिकट होतं. त्यामुळे थोडं-थोडं पाणी घालून मळा आणि शेवटी एक टीस्पून तेल टाकून पीठ मऊ करून घ्या.
मळल्यानंतर पीठ किमान १५-२० मिनिटं झाकून ठेवा. त्यामुळे ग्लूटन सेट होतं आणि चपाती मऊ व फुगणारी होते.
चपाती लाटताना फार जोरात दाबू नका. हलक्या हाताने, समान जाडीने लाटली तर ती दोन्ही बाजूंनी फुगते आणि मऊ राहते.
तवा फार गरम आणि थंड याच्यामध्ये असावा. जास्त गरम तव्यावर चपाती पटकन भाजून जळते, आणि थंड तव्यावर ती फुगत नाही. मध्यम आचेवर भाजणे उत्तम आहे.
चपातीवर छोटे बुडबुडे दिसू लागले की लगेच उलटा. खूप वेळ थांबल्यास ती कोरडी होते आणि फुगत नाही.
स्पॅटुला किंवा कापडाने हलका दाब देऊन चपातीच्या कडा दाबा. त्यामुळे आत हवा अडकते आणि ती फुगते.
दुसरी बाजू थोडी भाजल्यानंतर थेट गॅसवर ५ ते ६ सेकंद भाजा. चपाती पूर्ण फुगते आणि तिचा सुगंध अप्रतिम सुटतो.
फुगलेली चपाती काढल्यावर लगेच झाकण असलेल्या डब्यात ठेवा. त्यामुळे ती जास्तवेळ मऊ राहते.