Sakshi Sunil Jadhav
गव्हाचे पीठ, रवा, तेल, मीठ, फणाच्या गऱ्यांची पेस्ट, गुळ, ओलं खोबरं, वेलदोड्याची पूड इ.
एका परातीत गव्हाचं पीठ, रवा, मीठ व मोहन घालून चांगलं एकत्र करा. त्याचे घट्टसर कणीक मळून १५ मिनिटे झाकून ठेवा.
कढईत तूप गरम करून त्यात फणसाचा गर व खोबरं घाला.
त्यात गुळ टाका आणि मध्यम आचेवर सतत ढवळत शिजवा. मग वेलदोड्याची पूड घाला.
भिजवलेलं पीठ छोटे गोळे करून त्यात थोडं सारण भरून पुरीसारखी लाटून घ्या.
फार पातळ न लाटता मध्यम आकाराची ठेवा.
गरम तेलात हे पुरी एक-एक करून कुरकुरीत व सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
गरम फणसाची पुरी लोण्यासोबत, किंवा गोड चटणीसह खाण्यास दिली जाते.