Sakshi Sunil Jadhav
मशरुम प्रेमींसाठी एक भन्नाट आणि टेस्टी रेसिपी कशी बनवावी? हे आपण सोप्या स्टेप्सने जाणून घ्या.
आपण हॉटेल स्टाईल घी रोस्ट रेसिपी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
जिरे, धणे, काळी मिरी, बडीशेप, पाणी, मोहरी, मीठ, गूळ, दही, लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्या इ.
४०० ग्रॅम मशरुम, हळद, मसाला, कांदे २, कढीपत्ता, लिंबाचा रस, चिंच इ.
सगळ्यात आधी जिरे, बडीशेप, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या, धणे तव्यावर भाजून घ्या.
पुढे आलं, लसूण, चिंच, मीठ, खसखस, दही, पाणी यांची मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.
आता मशरुम धुवून त्याचे काप करा. त्यामध्ये सर्व मसाले घालून मॅरीनेट करा.
१० मिनिटांनी कढईत तूप गरम करून मशरुम परतून घ्या.
आता एका भांड्यात तूपात कांदे परता आणि प्युरीची फोडणी द्या. आता तळलेले मशरुम त्यामध्ये एकत्र करून सर्व्ह करा.
NEXT : फक्त १० मिनिटांत बनवा गरमा गरम, कुरकुरीत रवा थालीपीठ, खवय्यांची खास पसंती