Manasvi Choudhary
चमचमीत शेव भाजी खायला सर्वांना आवडते.
घरी शेव भाजी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
शेव भाजी बनवण्यासाठी शेव, कांदा, टोमॅटो, आलं - लसूण पेस्ट, लाल तिखट, धना पावडर, कोथिंबीर, जिरे मोहरी, हळद, तेल , मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे घाला.
नंतर यामध्ये चिरलेला कांदा आणि टोमटो घालून परतवा यात आले - लसूण पेस्ट घाला.
सर्व मिश्रण एकत्रित करून यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, मीठ घाला.
नंतर या संपूर्ण मिश्रणात शेव घाला. हळू हळू यामध्ये थोडे गरम पाणी घाला आणि शिजवून द्या.
अशापद्धतीने गरमा गरम शेव भाजी खाण्यासाठी तयार आहे.