Manasvi Choudhary
पालक पनीर हा लोकप्रिय पदार्थ आहे. हॉटेल व ढाब्यावर गेल्यानंतर अनेकजण पालक पनीर ऑर्डर करतात.
पालकमध्ये आयर्न आणि पनीरमध्ये प्रोटीन असल्याने ही एक पौष्टिक डिश मानली जाते. पालक पनीर घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. घरीच तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने पालक पनीरची रेसिपी करू शकता.
पालक पनीर बनवण्यासाठी पालक, कांदा, फ्रेश क्रिम, टोमॅटो, जिरे, रेड चिली पावडर, तूप हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून निवडून घ्या. त्यानंतर गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळून त्यात पालक शिजवून घ्या.
यानंतर पालक शिजवून ते एका प्लेटमध्ये काढा. त्यानंतर मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करा.
गॅसवर एका पॅनमध्ये तूप घाला त्यात जीरे आणि लसूण परतून घ्या. नंतर या मिश्रणात कांद्याची पेस्ट मिक्स करून चांगली परतून घ्या.
या संपूर्ण मिश्रणात टोमॅटोची पेस्ट मिक्स करा नंतर त्यात मीठ, लाल मसाला टाका. मिश्रणात पालकची पेस्ट आणि पनीरचे तुकडे मिक्स करून संपूर्ण मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या.
अशाप्रकारे पालक पनीर रेसिपी तुमची तयार आहे. पालक पनीरची ही रेसिपी तुम्ही रोटी, जिरा राईस सोबत सर्व्ह करू शकता.