Manasvi Choudhary
हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यानंतर चिकन लपेटा खायला सर्वांनाच आवडतो.
चिकन लपेटा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
चिकन लपेटा बनवण्यासाठी चिकन, दही, टोमटो, कांदा, आले- लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर, कस्तुरी मेथी, सुके खोबरे, काजू, कोथिंबीर, हिरवी मिरची, अंडे, तेल, वेलची दालचिनी, पाणी आणि मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम चिकन स्वछ धुवून त्याला मीठ, दही, आले लसूण पेस्ट, धने जिरे पावडर, हळद, लाल मसाला, कस्तुरी मेथी लावून मॅरीनेट करा.
नंतर खोबरे, काजू, मिरची-कोथिंबीर ची पेस्ट करा.
गॅसवर एका भांड्यात गरम तेलामध्ये मॅरीनेट केलेले चिकन फ्राय फ्राय करा.
आता गॅसवर दुसऱ्या भांड्यात तेलामध्ये वेलची व दालचिनी घाला नंतर त्यात कांदा घालून परतून घ्या नंतर यामध्ये मसाले आणि टोमॅटो पेस्ट घाला थोडे पाणी घालून मीठ घाला
आता तयार ग्रेव्हीत फ्राय चिकन टाकून मिक्स करा.5 मिनिटे उकळी येऊ द्या. आता वरून कसुरी मेथी टाकून मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनट ठेऊन गॅस बंद करा.