Manasvi Choudhary
ढाब्यावरचं चिकन करी खायला सर्वांनाच आवडतं.
चिकन करी घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
चिकन करी बनवण्यासाठी चिकन, दही, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पूड, जीरे पूड, तमाल पत्र, कांदा, टोमॅटो, मीठ, तेल, आलं - लसूण पेस्ट हे साहित्य घ्या.
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला दही यामध्ये आले-लसूण पेस्ट,लिंबाचा रस आणि सर्व मसाले लावून किमान 1तास मॅरीनेट करा.
नंतर गॅसवर कढईत गरम तेलात जिरे आणि खडा मसाला परतून घ्या.
नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यत परतून घ्या. यामध्ये टोमॅटो रस घाला.
या संपूर्ण मिश्रणात मॅरीनेटेड चिकन घालावे नंतर मीठ घाला.
चिकन मसाल्यामध्ये चांगले परतून घ्या. यामध्ये शिजण्यापुरते पाणी घालून झाकण लावा.
१५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या. नंतर यामध्ये कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे सर्व्हसाठी ढाबा स्टाईल चिकन करी तयार आहे.