Dhanshri Shintre
पावसाळ्यात केळी कोफ्ता करीची चव खास असते, ही स्वादिष्ट डिश तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तोंडाला पाणी सुटेल.
केळी कोफ्ता करी प्रामुख्याने कच्च्या केळ्यांचा वापर करून बनवली जाते आणि ती अतिशय स्वादिष्ट लागते.
स्मॅश केलेल केळी, जिरे पावडर, गरम मसाला, हिरवी मिरची, तूप, कांद्याची पेस्ट, उकडलेले बटाटे, कैरी पावडर, हिंग, कोथिंबीर, मीठ, टोमॅटो प्युरी.
एका भांड्यात मॅश केलेले केळी, बटाटे आणि इतर सर्व मसाले व कोथिंबीर एकत्र करून चांगले मिक्स करा आणि कोफ्त्याचे मिश्रण तयार करा.
मिश्रण एकसंध झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करा. आता तळण्यासाठी पॅनमध्ये थोडेसे तूप गरम करत ठेवा.
कोफ्ते छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा आणि नंतर टिश्यू पेपरवर काढा, ज्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल.
ग्रेव्हीसाठी कढई मध्यम आचेवर गरम करा, त्यात १ चमचा तूप टाका. नंतर कांद्याची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
नंतर त्यात टोमॅटो प्युरी घालून मध्यम आचेवर तेल वेगळे होईपर्यंत नीट परतून शिजवून घ्या.
यानंतर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एक मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या.
तळलेले कोफ्ते करीमध्ये टाकून चांगले मिसळा आणि गरम गरम सर्व्ह करा, जेवणाचा स्वाद वाढवा.