Crispy Onion Rings: ब्रेडक्रम्ब्सशिवाय खुसखुशीत ऑनियन रिंग्स; घरच्या घरी करा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळी चहा किंवा कॉफीसोबत खुसखुशीत स्नॅक खायची इच्छा होते. अशावेळी बाजारातील पदार्थांऐवजी घरच्या घरी झटपट ब्रेडक्रम्ब्सशिवाय ऑनियन रिंग्स तयार करता येतात.

Crispy Onion Rings Recipe

लागणारे साहित्य

2 मोठे कांदे, 1 कप बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1/2 चमचा लाल तिखट, 1/4 चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा, पाणी, तळण्यासाठी तेल इ.

Crispy Onion Rings Recipe

कांदे कापण्याची पद्धत

कांदे सोलून जाडसर गोल चकत्या करा. प्रत्येक चकती अलगद वेगळी करून रिंग्स तयार ठेवा.

Onion Rings Without Breadcrumbs

पीठ तयार करा

एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, मीठ आणि बेकिंग सोडा घालून मिसळा. त्यात थोडं थोडं पाणी घालत गाठी नसलेलं मध्यम पातळ पीठ तयार करा.

Onion Rings Without Breadcrumbs

कुरकुरीतपणासाठी खास टिप

तांदळाचे पीठ घातल्यामुळे ब्रेडक्रम्ब्सशिवायही रिंग्स जास्त खुसखुशीत होतात.

Besan Onion Rings

तेल गरम करा

कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल पुरेसं तापलं आहे का हे पाहण्यासाठी थोडं पीठ टाकून तपासा.

Besan Onion Rings

रिंग्स बुडवा

प्रत्येक कांद्याची रिंग पीठात पूर्णपणे बुडवून घ्या, जेणेकरून सर्व बाजूंनी कोटिंग होईल.

Besan Onion Rings

तळण्याची प्रक्रिया

गरम तेलात 4 ते 5 रिंग्स सावकाश सोडा. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

जास्तीचं तेल काढा

तळलेले अनियन रिंग्स टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे जास्तीचं तेल निघून जाईल. गरमागरम ऑनियन रिंग्स टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Besan Onion Rings

NEXT: Mental Health: महिनाभर मोबाईल वापरणं बंद केलं तर काय होईल? मेंदू आणि शरीरावर होणारे 7 परिणाम नक्की वाचा

social media
येथे क्लिक करा