Manasvi Choudhary
अनेकजण घरी पोह्यांचा, मक्याचा चिवडा बनवतात. चिवडा टाईमपास खायला सर्वांनाच आवडतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला मुरमुरा चिवडा रेसिपी सांगणार आहोत.
मुरमुरा चिवडा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सहज बनवू शकता.
मुरमुरा चिवडा बनवण्याचसाठी मुरमुरे, लसूण, जीरे, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, डाळ्या, खोबरा, मिरची, शेंगदाणे हे साहित्य एकत्र करा.
मुरमुरा चिवडा बनवण्यासाठी सर्वात पहिले मुरमुरे गाळणीने गाळून घ्या. म्हणजे त्यातील बारीक भुगा वेगळा होईल.
यानंतर गॅसवर कढईत तेलामध्ये जीरं, शेंगदाणे खरपूस तळा. यात चण्याची जाळ आणि कढीपत्ता देखील तळून घ्या
संपूर्ण मिश्रणात थोडी कोथिंबीर फ्राय करा. तळेलेले संपूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढा. यानंतर त्याच कढईमध्ये तेलामध्ये लसणाची चटणी घाला त्यात हळद, धनापावडर, हिंग, मसाले मिक्स करा. या मसाल्यांमध्ये नंतर कुरमुरे मिक्स करा.
कुरमुरे कुरकुरीत भाजून झाल्यानंतर त्यात तयार मिश्रण एकत्र करा. अशाप्रकारे घरच्याघरी कुरकुरीत मुरमुरा चिवडा तयार होईल.