Manasvi Choudhary
अनेकजण वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी पाळतात. अनेक असे पदार्थ खातात ज्यामुळे वजन कमी होईल.
वजन कमी करण्यासाठी खास पोह्यांचा डाएट चिवडा बाजारात मिळतो. पोह्यांचा डाएट चिवडा तुम्ही घरी देखील अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकता.
पोह्यांचा डाएट चिवडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. पोह्यांचा डाएट चिवडा बनवण्यासाठी पोहे, बारीक शेव, तेल, मीठ हे साहित्य एकत्र करा.
डाएट चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे चांगेल चाळून घ्यायचे आहेत. गॅसवर कढईमध्ये ते भाजून घ्यायचे आहेत.
भाजलेल्या पोह्यांमध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घाला आणि थोडेसे तेल मिक्स करा.
पोहे भाजल्यानंतर ते तुम्ही एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. त्यात तुम्ही शेव देखील मिक्स करू शकता.
अशाप्रकारे डाएट स्पेशल पोह्यांचा कुरकुरीत चिवडा सर्व्हसाठी तयार आहे.