Manasvi Choudhary
पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्यासाठी घरगुती हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
बाहेरील तेलकट तिखट पदार्थापेक्षा तुम्ही घरच्या घरी बनवलेले पदार्थ खा. सोयाबीन वडी ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता.
सोयाबीन वडी बनवण्यासाठी सोयाबीन, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, मसाला, हळद, धना जिरे पावडर, मीठ आणि तेल हे साहित्य घ्या.
सोयाबीन वडी बनवण्यासाठी सर्वातआधी गॅसवर एका पातेल्यात गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाका आणि १० मिनिटे शिजवून घ्या.
नंतर सोयाबीनमधील पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा. एका भांड्यामध्ये मसाला, हळद, धने जीरे पावडर, गरम मसाला,आलं लसूण पेस्ट,मिरची व कोथिंबीर घालून सर्व एकजीव करा
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये सोयाबीनच्या वड्या चांगल्या खरपूस फ्राय करून घ्या.