Siddhi Hande
साबुदाणा वडा लहान मुलांना खूप आवडतो. तुम्हाला उपवास सोडून इतर दिवशीदेखील साबुदाणा वडा बनवू शकतात.
साबुदाणा वडा बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. अनेकदा साबुदाणा कुरकुरीत होत नाही.
साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही सोपी ट्रिक वापरा.
साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणे ७-८ तास भिजत ठेवावेत.साबुदाण्यात जास्त पाणी टाकू नये, जेणेकरुन ते जास्त चिकट होती.
तुम्ही साबुदाणे एका परातीत काढा. त्यात शेंगदाण्याचा कूट टाका.
यामध्ये तुम्ही मिरचीची पेस्ट टाकावी. हे सर्व मिश्रण छान मिक्स करुन घ्यावे. यामध्ये कुठेही पाणी टाकू नये.
यानंतर या मिश्रणाचे छान गोल वडे बनवून घ्या.
यानंतर एका बाजूला कढईत तेल ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात एकेक साबुदाणा वडा सोडा.
हा साबुदाणा वडा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.