Siddhi Hande
उपवासाला रोजची साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही साबुदाणा वडा बनवू शकतात.
साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणे ५-६ तास भिजत ठेवा.
त्यानंतर बटाटे उकडून घ्या. बटाट्याची साल काढून घ्या.
यानंतर एका बाजूला मिक्सरमध्ये मिरची बारीक वाटून घ्या.
यानंतर एका परातीत साबुदाणे टाका. त्यावर बटाटे मस्त स्मॅश करुन टाका.
त्यानंतर त्यात बारीक केलेली मिरची आणि शेंगदाण्याचा कुट टाकून मस्त मिक्स करुन घ्या.
एका बाजूला कढईत तेल गरम करा.
त्यात साबुदाण्याचे बारीक आकाराचे वडे बनवून तळून घ्या. गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे वडे तळून घ्या.