Sakshi Sunil Jadhav
रवा, दही, कांदा, हिरव्या मिरच्या, आल्याचं तुकडा, उडद डाळ, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, बेकिंग सोडा, मीठ, तेल इ.
एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, आणि उडद डाळ टाकून फोडणी करा.
फोडणीत चिरलेला कांदा, मिरच्या, आणि आलं टाकून थोडं परतून घ्या.
आता त्यात रवा टाकून मध्यम आचेवर 3-4 मिनिटं परता. हे मिश्रण थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर दही, मीठ, कोथिंबीर आणि थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ तयार करा. झाकून 15-20 मिनिटं ठेवून द्या.
नंतर हवं असल्यास थोडा सोडा घाला आणि हाताला तेल लावून छोटे वडे बनवा. मधोमध थोडं छिद्र करा (उडिद वड्यासारखे).
गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळा.