Dhanshri Shintre
जेव्हा भूक तीव्र होते, तेव्हा आपल्या सर्वांना काहीतरी जलद आणि अतिशय समाधानकारक हवे असते.
घरच्याघरी करा बटाट्याच्या कुरकुरीत रिंग, चवदार स्नॅक्स जो तुम्ही थोड्याच वेळात बनवून खाऊ शकता.
चिली फ्लेक्स १ चमचा, ओरेगॅनो १ चमचा, मीठ, २-३ उकडलेले बटाटे, १/४ कप रवा, लसूण, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोर
एक पॅन घ्या, त्यात थोडं बटर वितळवा. नंतर त्यात लसूण, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाका. थोडा वेळ शिजवा त्यानंतर त्या मिश्रणात पाणी घाला.
मिश्रणाला एक उकळ येऊ द्या. नंतर तयात रवा घाला. जोपर्यंत रवा सर्व पाण्यात भिजत नाही तोपर्यंत तो ढवळा. पूर्ण झाल्यावर हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
२-३ उकडलेले बटाटे स्मॅश करुन घ्या. नंतर ते थंड झालेल्या मिश्रणात ते मिसळा. हे सर्व त्या गुळगुळीत पीठात नीट मळून घ्या.
पीठाचा गोळा करा आणि ते चाकूचा वापर करुन लहान रिंग कापून घ्या. लांब पट्ट्या कापून त्यांना वर्तुळाचा आकार द्या.
कॉर्नफ्लोरने रिंगला हलके कोट करा आणि सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
कुरकुरीत बटाट्याचे रिंग तुमच्या आवडीनुसार टमाटर सॉस किंवा हरी चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करा.
NEXT: झटपट स्नॅक्ससाठी बनवा स्वादिष्ट मसाला रवा अप्पम, जाणून घ्या रेसिपी