Manasvi Choudhary
पावसाळ्यात नाश्त्याला गरमा गरम पदार्थ खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही क्रिस्पी पोहा वडे ही रेसिपी ट्राय करा.
क्रिस्पी पोहा वडे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तु्म्ही घरीच ही रेसिपी ट्राय करू शकता.
क्रिस्पी पोहा वडे बनवण्यासाठी पोहे, तांदळाचे पीठ, गाजर, सिमला मिरची, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला, धना पावडर, आलं, लाल मसाला, हळद आणि मीठ हे साहित्य घ्या.
क्रिस्पी पोहा वडे बनवण्यासाठी सर्वातआधी पोहे स्वच्छ धुऊन घ्या नंतर एका भांड्यात पाण्यामध्ये पोहे ४ ते ५ तास भिजत ठेवा.
सर्व भाज्या बारीक कापून घ्या. गाजर किसून घ्या. कांदा व सिमला मिरची बारीक कापा. मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करा.
एका भांड्यात गाळणीने पोहे गाळून घ्या. नंतर त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा.
मिश्रणात पाणी न टाकता मिश्रण हाताने चांगले मळून त्याचा गोळा तयार करा.नंतर छोटो गोळे घेऊन त्याला टिक्की सारखा आकार द्या.
गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर मिडीयम गॅस करून त्यात तयार वडे सोडा व दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.