Manasvi Choudhary
सकाळची सुरूवात हलक्या आहाराने करा.
सकाळी तिखट पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते.
पेपर डोसा हा अत्यंत पौष्टिक आणि हलका आहार आहे.
पेपर डोसा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पेपर डोसा बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे, चणाडाळ, मीठ आणि बटर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम उडीद डाळ आणि तांदूळ यामध्ये मेथी दाणे हे स्वच्छ धुवून भिजत घाला.
नंतर या संपूर्ण मिश्रणाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
नंतर मिश्रणात मीठ घालून ४ ते ५ तास आंबवण्यासाठी ठेवा.
गॅसवर गरम तव्यामध्ये पाणी शिंपडून डोशाचे पीठ पातळ पसरवून घ्या.
डोसा दोन्ही बाजून शिजल्यानंतर बटर घाला.
अशाप्रकारे पातळ कुरकुरीत पेपर डोसा सर्व्हसाठी तयार आहे