Saam Tv
पालक, लसूण, जीरा, हिरवी मिरची, धना पावडर, गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, तीळ, तांदळाचे पीठ, बेसन, पाणी इत्यादी.
सगळ्यात आधी स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग बारिक चिरा.
आता मिरची, जिरे आणि लसणाची पेस्ट तयार करा.
आता एका ताटात सगळे जीन्नस मिक्स करा आणि पीठ टाकून कणकेप्रमाणे मळून घ्या.
कणिक मळल्यावर त्याला उभा आकार द्या.
आता कणिक एका गरम पाण्यावर झाकणावर वाफवून घ्या.
कणिक सुकले की अळू वडीप्रमाणे त्याचे काप करा.
गरम तेलात पालक वड्या तळायला सुरुवात करा.
वडी कुरकुरीत होईपर्यंत परता. तयार आहेत तुमच्या खमंग पालक वड्यांची रेसिपी.