Siddhi Hande
नाश्त्याला कधी कधी कुरकुरीत खायची इच्छा होते. तुम्ही छान पालक पकोडादेखील बनवू शकतात.
पालक पकोडा खायला खूप चविष्ट लागते. ही रेसिपी खूप सोपी आहे.
पालक पकोडा बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला पालक कापून घ्यायचा आहे.
एका भांड्यात चिरलेला पालक, बेसन, तांदळाचे पीठ टाका.
यात चिरलेला कांदा, आलं-लसूण आणि मिरची पेस्ट टाका. त्यावर ओवा, तीळ आणि हळद टाका.यात मीठ टाका.
यानंतर त्यात थोड पाणी टाका. हे पीठ थोडं घट्ट असू द्या.
यानंतर एका कढईत तेल टाका. तेल छान गरम होऊ द्या
त्यात या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करुन सोडा. हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
यानंतर हे पालक पकोडे तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात.