Manasvi Choudhary
पावसाळ्यात गरमा गरम भजी खाण्याची एक वेगळीच मज्जा असते.
कांदा, बटाटा भजी खाऊन तुम्हाला कंटाळा असेल तर तुम्ही पालकची भजी खास बनवू शकता.
पालक भजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पालक भजी बनवण्यासाठी पालक, बेसन, मीठ, हळद, मसाला, तेल, कॉर्नफ्लॉअर, ओवा, जिरा हे साहित्य घ्या.
पहिल्यांदा पालक व्यवस्थित धुवून निवडून घ्यावा. एका भांड्यात बेसन घ्या त्यात थोडे पाणी घाला.
नंतर मिश्रणात मीठ, हळद, मसाला, ओवा, जिरे आणि कॉर्नफ्लॉअर मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण छान ढवळून घ्या. त्यात पालकची पाने मिक्स करा.
गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवा तेल गरम झाल्यानंतर एक एक भजी हळूवारपणे तेलामध्ये सोडा.
भजी सोनेरी रंग येईपर्यत चांगली तळून घ्या.
अशाप्रकारे कुरकुरीत पालक भजी घरच्याघरी तयार होतील.