Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला पौष्टिक आणि चटपटीत काही तरी खायचं असेल तर तुम्ही डाळींच्या भजी ट्राय करू शकता.
पालक आणि मुगाच्या डाळीची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
पालक- मुगाची डाळ भजी बनवण्यासाठी मुगाची डाळ, पालक, हिरवी मिरची, आले- लसूण पेस्ट, हिंग, हळद, लाल मसाला ओवा, तांदळाचे पीठ, मीठ, तेल साहित्य एकत्र करा.
पालक- मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी मुगाची डाळ भिजत घाला नंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. डाळ खूप बारीक करू नका, थोडी जाडसर राहिल्यास भजी कुरकुरीत होतात.
एका मोठ्या भांड्यात वाटलेली डाळ घ्या त्यात बारीक चिरलेला पालक, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, हिंग, हळद, तिखट, ओवा आणि मीठ घाला.
तयार मिश्रणात तांदळाचे पीठ घाला. यामुळे भजी तेल कमी घेतात. आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हाताने किंवा चमच्याने भजीचे छोटे छोटे गोळे सोडा. भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
अशाप्रकारे गरमागरम भजी पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉसपसोबत सर्व्ह करा.