Sakshi Sunil Jadhav
चहानंतर किंवा जेवणानंतर अचानक लहान भूक लागते.
पुढे आपण नाश्त्यासाठी पौष्टिक आणि चटपटीत चिवडा कसा तयार करायचा हे जाणून घेणार आहोत.
ज्वारीच्या लाह्या, डाळं, कडीपत्ता, तेल, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, शेंगदाणे, चिवडा मसाला इ.
सर्वप्रथम कढईत तेल गरम करून घ्या.
तेलात आधी जिरे घाला आणि परतून घ्या.
आता कडीपत्ता परतून घ्या. मग डाळं परता.
फोडणीमध्ये आता शेंगदाणे परतून घ्या. मग हिरव्या मिरचीचे तुकडे घाला.
आता नाचणीच्या लाह्या घ्या. त्यात तयार फोडणी ओता.
चिवडा व्यवस्थित मिक्स करून त्यावर मसाले घालून डब्यामध्ये साठवून ठेवा.