Manasvi Choudhary
पावसाळ्यात अवघ्या २० मिनिटांत बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत मूग भजी
पावसाळ्यात गरमा गरम मूग भजी खाण्याची मज्जाच वेगळी असते.
पण अनेकांची भजी कुरकुरीत न होता मऊ बनतात. मूग भजी हा पदार्थ घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पण तुम्हाला कुरकुरीत भजी बनवायची असेल तर काही टिप्स फॉलो करा.
मूग भजी बनवण्यासाठी मूग डाळ, बेसन, कांदा, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम मूग डाळ बनवण्याच्या ३ ते ४ तास आधी भिजत घाला. नंतर भिजलेली मूगडाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
डाळ वाटताना पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर मिश्रणात कांदा, मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ हे एकत्र मिक्स करा.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये पिठाचे छोटे छोटे गोळे करून सोडा. मूग भजी सोनेरी रंग येईपर्यत चांगली तळून घ्या.
अशाप्रकारे मूग भजी सर्व्हसाठी तयार आहेत.