Manasvi Choudhary
चवीला कडू असली तरी मेथी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
तुम्हालाही मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर मेथीची भजी बनवा.
मेथीची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मेथीची भजी बनवण्यासाठी मेथीची भाजी, चणा डाळ, मिरची पावडर, गरम मसाला, तेल, जीरे, खाण्याचा सोडा, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम मेथीची भाजी स्वच्छ साफ करून ती धुवून घ्या.
यानंतर एका भांड्यात चण्याचे पीठ, हळद, लाल तिखट, जिरेपूड, गरम मसाला, खाण्याचा सोडा आणि मीठ हे मिश्रण एकत्रित करा.
नंतर यासंपूर्ण मिश्रणात बारीक चिरलेली मेथी आणि पाणी घाला.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून तळून घ्या.
सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी नीट तळून घ्या.