Siddhi Hande
रोज नाश्त्याला काय बनवायचा असा प्रश्न पडलेला असतो. तुम्ही घरीच मटार कचोरी ट्राय करा.
मटार कचोरी बनवण्यासाठी सर्व सर्व प्रकारची पिठे एकत्रित करा. जर तुम्हाला सर्व पीठ नसतील हव्हे तर फक्त गव्हाचे पीठ घ्या.
यात बेकिंग पावडर टाकून पीठ छान मळून घ्या. यात थोडं तेल टाका. हे पीठ मळून बाजूला ठेवा.
यानंतर सारण बनवण्यासाठी वाटाणे थोडे उकडून घ्या. त्याचसोबत बटाटेदेखील उकडून घ्या.
यानंतर हे सर्व एकत्रित मॅश करुन घ्या.
यानंतर एक पॅनमध्ये तेल टाका. त्यात मोहरी टाका. त्यानंतर अदरक पेस्ट आणि मिरची पेस्ट टाका.
यानंतर त्यात छान मसाले, धना पावडर, मिरची पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर टाकून मस्त मिक्स करा.
यानंतर तुम्हाला पीठाची गोल पुरी लाटून घ्यायची आहे. यामध्ये हे मिश्रण भरा आणि वरुन बंद करा.
एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात या कचोरी टाकून मस्त तळून घ्या.