Manasvi Choudhary
आज १४ जुलै २०२५ संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पााला खास मोदकाचे नैवेद्य दाखवतात.
उकडीचे मोदक घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ पीठ, तूप, दूध, मीठ, खोबरे, गूळ, वेलची पावडर, खसखस, काजू- बदाम हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी उकळवून घ्या नंतर परातीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन पाणी मिक्स करा. पीठ मळून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवा.
मोदकाचे सारण तयार करण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तूपमध्ये किसलेले खोबरे आणि गूळ घाला.
मिश्रणात वेलची पावडर मिक्स करून संपूर्ण मिश्रण छान परतून घ्या.
सारण छान एकजीव झाल्यानंतर एका भांड्यात काढून थंड करून घ्या. सारण जास्त घट्ट् होणार नाही याची काळजी घ्या.
मोदक तयार करण्यासाठी मळलेले पीठाचे छोट्या आकाराचे गोळे करून ते मध्यम आकाराचे करा.
नंतर पीठाच्या गोळ्यामध्ये तयार सारण घालून पाकळ्या तयार करून घ्या.
वरच्या बाजूला या पाकळ्या दाबून घ्या म्हणजे तुम्हाला मोदकाला आकार देणं अधिक सोपे होईल
अशाप्रकारे मोदक तयार झालेले तेल लावून वाफवायला एका भांड्यात चाळणीमध्ये ठेवा.