Saam Tv
कोथिंबीर, बेसन, लसूण, आलं, हिरवी मिरची, पांढरे तीळ, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, शेंगदाण्याचा कूट, जिरं, ओवा, तेल, साखर इ.
सगळ्यात आधी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. मग बारिक चिरुन घ्या.
आता खलबत्यात लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या ठेचून घ्या.
आता बेसनामध्ये सगळे मसाले, जिन्नस, वाटण करून घ्या.
आता थोडं थोडं पाणी ओतून वड्यांसाठी जाडसर पीठ करा.
आता एका कढईकत पाणी गरम करायला ठेवा.
१० मिनिटांनी एका चाळणीला तेल लावून पीठाचे लांब लचक गोळे तयार करून स्टीमरवर ठेवा.
२० मिनिटांनी चाळणीतले पीठ काढून त्यांना सुरीने कट करा. आणि तेल गरम करा.
तेल तापलं की ४ ते ५ वड्या तळून घ्या. वडी लगेच तरंगली तर तेलाचं तापमान योग्य आहे. अशाप्रकारे तुम्ही कुरकुरीत कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी करू शकता.