Manasvi Choudhary
कोथिंबीर वडी खायला सर्वानाच आवडते. आपल्याकडे सणासुदीला जेवणात खास कोथिंबीर वडी करतात.
कोथिंबीर वडी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीर, बेसन, तांदूळ पीठ, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, गरम मसाला, दालचिनी, तेल आणि मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि मिरची पेस्ट करा. गरम मसाला पावडर तयार करा.
एका भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या. नंतर यात आलं, लसूण आणि मिरची पेस्ट घाला.
संपूर्ण मिश्रणात चवीनुसार मीठ घाला आणि मिश्रण मिक्स करा. या मिश्रणात तांदूळ पीठ व बेसन घालून घट्ट गोळा बनवा.
एका कुकरच्या एका भांड्यात थोडे पाणी दुसऱ्या बाजूला चाठणी ठेवून कोथिंबीर वडी उकडून घ्या.
वड्या उकडून झाल्यावर त्या चौकोनी कापून घ्या. गॅसवर कढईत गरम तेलामध्ये कोथिंबीर वडी तळून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी कोथिंबीर वडी तयार करा.