Siddhi Hande
करंजी हा पदार्थ फक्त दिवाळीतच नाही तर तुम्ही इतर दिवशीही बनवू शकतात. करंजी जास्त दिवस टिकते.
करंजी बनवण्यासाठी सर्वात आधी खोबरे किसून घ्या. त्यानंतर ते भाजून घ्या. भाजून झाल्यावर रवादेखील भाजून घ्या.
यानंतर कढईत तूप टाका. त्यात काजू, बदाम हे सर्व भाजून घ्या.
यानंतर एका मोठ्या ताटात पीठी साखर, वेलची पावडर आणि रवा टाका. त्यात भाजलेले खोबरे टाका.
एका बाजूला आवरण तयार करण्यासाठी मैदा चाळून घ्या. त्यात थोडं गरम तूप टाका. हे पीठ छान मळून घ्या.
यानंतर पीठाच्या बारीक पुऱ्या करुन घ्या. त्यात एका बाजूला तयार केलेले सारण टाका.
ही पूरी करंजीच्या साच्यात ठेवून कापून घ्या.
यानंतर तेलात करंजी तळून घ्या. गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत मस्त तळून घ्या.