Siddhi Hande
कांदाभजी हा पदार्थ सर्वचजण आवडीने खातात. पावसात तर कुरकुरीत भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते.
तु्म्ही पाण्याशिवाय कुरकुरीत कांदाभजी बनवू शकतात.
सर्वात आधी तुम्हाला कांदा उभा आणि बारीक कापून घ्यायचा आहे.
यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्यायचे आहे. त्यात थोडा ओवा, हळद टाकायची आहे.
यानंतर त्यात लाल तिखट,बारीक चिरलेली मिरची टाका. आवश्यकतेनुसार मीठ टाकून मस्त मिक्स करुन घ्या.
यानंतर यात पीठात कांदा टाका. कांदा छान मिक्स करा.
या मिश्रणात पाणी टाकायची गरज नाही. कांद्याला आपोआप पाणी सुटते. त्यामुळे मिश्रण थोडे ओले होते.
यानंतर एका बाजूला कढईत तेल तापत ठेवा. तेलाला उकळी आल्यानंतर त्यात हळूहळू भजी सोडा.
भजी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.