Siddhi Hande
केळीचे वेफर्स खायला अनेकांना आवडतात. तुमच्या घरच्या घरीदेखील दहा मिनिटांत केळीचे वेफर्स बनवू शकतात.
केळीचे वेफर्स बनवण्यासाठी तुम्ही कडक आणि कच्ची केळी निवडा.
कच्च्या केळीचे एकदम बारीक काप करायचे आहे.
हे केळीचे काप मीठाच्या पाण्यात काही वेळ भिजण्यासाठी ठेवा.जेणेकरुन त्याचा स्टार्च निघून जाईल.
यानंतर सुरुवातीला एका भांड्यात हळद, मीठ आणि केळीचे काप एकत्र करुन घ्या.
हे काप ५ मिनिटांसाठी ठेवून द्या. त्यानंतर हे काप चाळणीत काढून ते व्यवस्थित हलवून घ्या.
यानंतर एका कढईत खोबरेल तेल मध्यम आचेवर गरम करा.
त्यानंतर हे काप तेलात कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.