Manasvi Choudhary
पावसाळा सुरू झाला की बाजारात अनेक पौष्टिक रानभाज्या दिसायला लागतात. यापैकीच एक अत्यंत आरोग्यदायी भाजी म्हणजे कंटोळी.
कंटोळीची भाजी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. कंटोळीच्या भाजीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.
कंटोळीच्या भाजीची तुम्ही अत्यंत सोप्या पद्दतीने कंटोळी फ्राय ही रेसिपी करू शकता.
फ्राय कंटोळी बनवण्यासाठी कंटोळी, तांदळाचे पीठ, मसाला, हळद, धने- जीरे पावडर, हिरवी मिरची, मीठ, साखर, तेल हे साहित्य एकत्र करा.
कंटोळी फ्राय बनवण्यासाठी कंटोळी स्वच्छ धुवून घ्या. नंतर कंटोळीच्या बिया काढून गोलाकार आकारात बारीक कापून घ्या.
एका भांड्यामध्ये तांदळाचे पीठ, मीठ, मसाला, हळद,धने जीरे पावडर,साखर व मिरची सर्व मिश्रण एकत्र करा.
सर्व मिश्रण एकत्र करून त्यात कंटोळीच्या बारीक कापा मिक्स करा. गॅसवर तव्यावर गरम तेलामध्ये कंटोली शॅलो फ्राय करा
अशाप्रकारे कुरकुरीत कंटोळी फ्राय रेसिपी घरच्या घरी तयार आहे.