Saam Tv
बाजारातून चिप्स विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरीच स्वच्छ पद्धतीने बटाट्याचे चिप्स तयार करू शकता.
२ मोठ्या आकाराचे बटाटे, मीठ, चाट मसाला आणि तेल इ.
तुम्ही बटाटा न सोलता चिप्स तयार करू शकता. त्यासाठी बटाटा स्वच्छ धुवून घ्या.
बटाटे धुतल्यावर त्याचे पातळ आकारात काप करा. आता कापलेले बटाटे पुन्हा पाण्यात धुवून घ्या आणि सुती कापडाने पुसून घ्या.
ओले बटाटे कधीच तळू नका. गरम तेलात ओले पदार्थ गेल्याने तेल उडण्याची शक्यता आहे.
त्यासाठी बटाटे फॅन खाली सुकवून घ्या आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवा.
आता त्यात चिप्स तळून घ्या. ते जळणार नाहीत याची काळजी घ्या.
आता तयार चिप्स ठेवण्यासाठी एका भांड्यात मीठ आणि चवीपुरता चाट मसाला घ्या.
आता गरमा गरम चिप्स थंड झाल्यावर मसाल्यात हलक्या हाताने मिक्स करून घ्या. तयार आहेत तुमचे बटाट्याचे क्रंची चिप्स.