Saam Tv
नाश्ता असो किंवा स्टाटर 'चीज बॉल्स' असा पदार्थ आहे जो आपण कधीही तयार करून खाऊ शकतो.
चला तर जाणून घेऊ क्रिस्पी आणि क्रंची चीज बॉल्सची सगळ्यात सोपी रेसिपी.
उकडलेले बटाटे, किललेले चीज, कॉर्न फ्लोवर, काळी मिरी पावडर, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ.
उकडलेले बटाटे किसून घ्या आणि बटाट्यात काळी मिरी,मीठ आणि कोथिंबीर घालून हाताने मिक्स करा.
आता त्यात चीज मिक्स करून मिश्रण एकदम बारिक करून घ्या.
एका वाटीत कॉर्न फ्लोवर आणि पाणी ओतून घट्टसर स्लरी तयार करा. आता तयार बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे तयार करा.
तेल गरम झाल्यावर त्यात एक एक गोळा कॉर्न फ्लोवरच्या स्लरीत मिक्स करून तळून घ्या.
गोळे गोल्डन होईपर्यंत तळा आणि गरमा गरम सर्व्ह करा.