Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला चहाच्या वेळी कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीरची भजी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता.
कोथिंबीर भजी बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.
कोथिंबीर भजी बनवण्यासाठी कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, आले- लसूण, ओवा, पांढरे तीळ, हळद, लाल मसाला, तेल, मीठ हे साहित्य एकत्र करा.
एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या. लक्षात ठेवा, कोथिंबीर धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी असावी, जेणेकरून पीठ जास्त पातळ होणार नाही.
कोथिंबीरमध्ये आले-लसूण-मिरची पेस्ट, ओवा, तीळ, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.
आता त्यात तांदळाचे पीठ आणि थोडे-थोडे बेसन घालून मिक्स करा. कोथिंबीरला सुटणाऱ्या पाण्यातच आधी पीठ मळून घ्या.
या मिश्रणात थोडेसे पाणी घाला मात्र मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या ते थोडे घट्टच हवे, जेणेकरून भजी कुरकुरीत होतील.
पिठात एक चमचा गरम तेल घाला. यामुळे भजी तेलकट होत नाहीत आणि छान खुसखुशीत होतात.