Siddhi Hande
दिवाळी सुरु होणार आहे. दिवाळीत घरी फराळ बनवतात.
दिवाळीला अनेकजण भाजणीची, तांदळाची चकली बनवतात. यंदा घरी बटर चकली बनवा.
बटर चकल बनवण्यासाठी सर्वात आधी चना डाळ भाजून घ्या. त्यानंतर डाळ मिक्सरमध्ये बारीक करा.
यानंतर एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ, भाजलेल्या चनाडाळीचे पीठ, बटर, बेसन, मीठ, हिंग आणि जिरे टाका.
यात बटर समान प्रमाणात टाकून एकदम व्यवस्थिक मिक्स करा. यानंतर त्यात पाणी टाकून पीठ मळून घ्या.
हे पीठ जास्त पातळ किंवा एकदम कदम मळू नका.
यानंतर हे पीठ चकलीच्या साच्यात टाका. त्यानंतर चकल्या पाडून घ्या.
त्यानंतर कढईत तेल तापवून घ्या. त्यात या तयार चकली सोडा.
चकली छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. ही चकली बटर पेपरवर ठेवा जेणेकरुन त्यातील तेल निघून जाईल.