Siddhi Hande
नाश्त्याला काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खायची सर्वांनाच इच्छा होते. अशावेळी तुम्ही ब्रेड पकोडा बनवू शकतात.
ब्रेड, उकडलेले बटाटे, कांदा, हिरव्या मिरची, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, हळद,मीठ, बेसन पीठ, ओवा, हळद, तिखट, पाणी, तेल
सर्वात आधी तुम्हाला बटाट्याचे सारण बनवायचे आहे. त्यानंतर पीठ तयार करा.
सर्वात आधी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट टाका.
यानंतर कांदा छान परतून घ्या. त्यात हळद, उकडलेले बटाटे टाकून मॅश करा. त्यात मीठ आणि कोथिंबीर टाका.
यानंतर एका भांड्यात बेसन घ्या. त्यात हळद, तिखट मीठ टाका. त्यात पाणी टाकून थोडं दाट पीठ भिजवा,
यानंतर ब्रेड स्लाइसवर बटाट्याचे सारण लावा त्यावर दुसरी स्लाइस ठेवा.
यानंतर ब्रेड बेसनाच्या पीठात बुडवून गरम तेलात तळून घ्या. छान सोने रंग येईपर्यंत ब्रेड पकोडा तळून घ्या.