Manasvi Choudhary
चटपटीत पोहे बॉल्स खायला सर्वांना आवडतात.
पोहे बॉल्स घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पोहे बॉल्स बनवण्यासाठी पोहे, बटाटा, कांदा, टोमॅटो, मसाले आणि तेल हे साहित्य घ्या.
पोहे थोडं पाण्याने भिजवून घ्या आणि पाणी पूर्णपणे काढून टाका.
उकडलेले बटाटे थंड झाल्यावर त्यांचे छोटे तुकडे करा.
कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
एका भांड्यात तेल गरम करा. त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची परतून घ्या.
गरम मसाला, लाल तिखट, धने पूड आणि मीठ मिक्स करा.
मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करा.
तेल गरम करून त्यात बॉल्स तळून घ्या.
गरमागरम पोहे बॉल्स कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा