Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला हेल्दी व टेस्टी पदार्थ खाण्याची चटक लागते.
ब्रेड कटलेट ही एक सोपी रेसिपी आहे जी तुम्ही सकाळी बनवू शकता.
ब्रेड कटलेट बनवण्यासाठी उकडलेला बटाटा, ब्रेड, लाल तिखट, कॉन फ्लोअर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले- लसूण पेस्ट, लिंबाचा रस, चाट मसाला, चवीनुसार मीठ, तेल हे साहित्य घ्या.
ब्रेड कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्या. ब्रेड स्लाईसचे बारीक तुकडे करून एका भांड्यात ठेवा.
ब्रेडच्या तुकड्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करा. हे मिश्रण एकत्रित करून घ्या.
आता या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कॉर्न फ्लोअर, आले- लसूण पेस्ट हे घाला.
त्यानंतर संपूर्ण मिश्रणात लाल तिखट, चाट मसाला, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
नंतर हे मिश्रण गोल आकारात ब्रेड कटलेट प्रमाणे बनवून घ्या. गॅसवर गरम तेलात ब्रेड कटलेट सोनेरी रंग येईपर्यत तळून घ्या.
अशाप्रकारे कुरकुरीत चटपटीत ब्रेड कटलेट तयार आहे.