Siddhi Hande
केळ्याचे चिप्स हे लहानापांसून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. तुम्ही घरीदेखील केळ्याचे चिप्स बनवू शकतात.
सर्वात आधी कच्ची केळी सोलून घ्या.
एका भांड्यात तुम्ही थंड पाणी घ्या. त्यात मीठ टाका.
या पाण्यात सोललेली केळी काही वेळ ठेवा. त्यानंतर केळ्याचे काप करुन घ्या.
यानंतर कापलेले काप १० मिनिट कागदावर पसरवा. ते चांगले सुकू द्या.
यानंतर एका बाजूला तेल तापत ठेवा. त्यात हे सुकलेले काप टाकून मस्त तळून घ्या.
यानंतर हे काप टिश्यू पेपरवर टाका. जेणेकरुन त्यातील तेल निघून जाईल.
यानंतर चिप्सवर मसाला, काळी मिरीपूड आणि मीठ टाकून मस्त मिक्स करा.
Next: मुंबईच्या रस्त्यांवरचा खास बॉम्बे सँडविच घरीच करून पाहा, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी