Saam Tv
वडा पाव घरी तयार करायचा ठरवलं तर तो नरम आणि साधा होतो त्याला स्ट्रीट फूडसारखा चटपटीतपणा राहत नाही.
याचाच विचार करून आम्ही तुमच्यासाठी स्ट्रीट स्टाईल चटपटीत आणि कुरकुरीत वडा पाव रेसिपी आणली आहे. चला तर जाणून घेऊ.
२उकडवून मॅश केलेला बटाटा, ४ हिरव्या मिरच्या, आलं लसुण पेस्ट, काळी मोहरी, जिरे १ चमचा, हळद, मीठ, बेसन, मिरची, कढीपत्ता, खायचा सोडा आणि तेल इ.
सर्वप्रथम भोडणी देऊ. त्यासाठी एक कढई घ्या ती तापली की, त्यात तेल मग मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घाला.
मग पुढे फोडणीला सुंगध सुटला की, आलं लसुण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घाला.
आता त्यात हळद, उकडलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ घाला.
लक्षात असु द्या त्या भाजीचे तुम्हाला गोळे म्हणजेच वडे तयार करायचे आहेत. त्यामुळे भाजी पातळ करू नका.
आता तुम्ही ५ ते ६ मिनिटे भाजी शिजवा आणि थंड करा. मग हाताला तेल लावून वडे वळून तयार ठेवा.
आता बेसन घेऊन त्यात मसाला, मीठ, खायचा सोडा आणि हळद तसेच आलं- लसूण पेस्ट करून बेसन तयार करून घ्या. ते थोडे पातळ असेल.
आता पुन्हा एक कढई घ्या. त्यात तेल गरम करून वडे तळायला सुरुवात करा.
वडा तळताना तुम्ही तो करपणार नाही याची काळजी घ्या. आणि बाजारात मिळणारी लसणाची चटणी विकत आणून गरमा गरम वडा पाव मिरचीसोबत सर्व्ह करा.