Manasvi Choudhary
आलू चिली हा चटपटीत पदार्थ खायला सर्वांना आवडतो.
आलू चिली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
आलू चिली बनवण्यासाठी बटाटे, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ, कश्मिरी मसाला, चिलीसॉस, मिरची, लसूण, आलं, सिमला मिरची, सोया सॉस, कांद्याची पात, मीठ, तेल, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
आलू चिली बनवण्यासाठी बटाटा सोलू त्याचे उभे काप करा आणि पाण्यात भिजत ठेवा.
नंतर एका भांड्यात बटाट्याचे काप घ्या त्या कॉर्नफ्लॉअर, तांदळाचे पीठ, मिरी पावडर, कश्मिरी मसाला, हे सर्व मसाले घाला.
यात नंतर चिली सॉस मिक्स करा आणि तांदळाचे पिठ मिक्स करा. सर्व मिश्रण काही वेळ ठेवा.
गॅसवर उभे चिरलेले बटाटे मिठ लावून तळून घ्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये गरम तेलामध्ये मिरची, आले, लसूण, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
नंतर यामध्ये सिमला मिरची घालून मिरी पावडर, चिली सॉस, कश्मिरी मसाला, कोथिंबीर, कांदा पात आणि मीठ घालून मिक्स करा.
सर्व भाज्या नीट परतून घ्या यामध्ये थोडे पाणी आणि कॉर्नफ्लॉअर टाकून कुरकुरीत बटाटा चिप्स टाका.
सर्व भाज्यामध्ये हे बटाटे चिप्स नीट परतून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी चमचमीत आलू चिली तयार आहे.